धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानकडून हातावर पोट असलेल्या 5000 गरजूंना किराणा वाटप

परळी शहरातील हातावर पोट असलेल्या गरजूंना २१ दिवस पुरेल एवढे किराणा सामान शासकीय नियमांचे पालन करुन पोच केले जात आहे.
dhananjay mundes nath pratishthan donates essentials commodities to 5000 families
dhananjay mundes nath pratishthan donates essentials commodities to 5000 families
Published on
Updated on

परळी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या कामगार, मजूर, हातरिक्षा चालक, घरकाम करणाऱ्या महिला आदींची मोठी अडचण झाली आहे.

याच्यावर मात करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानने शहरातील पाच हजार लोकांना २१ दिवस पुरेल एवढे किराणा साहित्य वाटप करण्याचे काम हाती घेतले आहे.

परळीतील गरजू लोकांची यादी बनवण्यात आली असून, कोणालाही यासाठी घराबाहेर जावे लागणार नाही असे नियोजन केले आहे. प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना घरपोच हे सामान दिले जात आहे. गुरुवार व शुक्रवारी हे काम केले जात आहे.

नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक कराड, सचिव नितीन कुलकर्णी यांनी यासाठी नियोजन केले आहे. या किटमध्ये प्रामुख्याने तांदूळ, तेल, मीठ, साखर, चहा पावडर, तूरडाळ, चटणी, हळद असे साधारण २१ दिवस पुरेल एवढे किराणा साहित्य आहे.
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com